जातीपातीच्या आधारावर राजकारण करत समाजात तेढ पवारांनी केली ; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आरोप

कणकवली : पवारांनी महाराजांच्या इतिहासाला वादग्रस्त ठरविण्याचा प्रयत्न केला. जातीपातीच्या आधारावर राजकारण करण्याचा प्रयत्न करुन मराठा आणि इतर समाजात तेढ निर्माण करुन त्याचा फायदा स्वतःच्या राजकारणासाठी करुन घेतला, अशी घणाघाती टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली आहे.

आपल्या सिधुदुर्ग दौऱ्यावर असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल भाष्य केले.”शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेपासूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाला वादग्रस्त बनविण्याचे काम सुरू झाले. शरद पवार कधीही आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेखही करत नव्हते. त्यांची जूनी सगळी भाषणं काढून पहा. व्यासपीठावर शाहू फुले आंबेडकर, यांच्याच प्रतिमा त्यांच्या व्यासपीठावर दिसायच्या कारण महाराजांचे नाव घेतलं की मुस्लीम मतं मिळत नाहीत.”, असा हल्लाबोल त्यांनी पवारांवर चढविला.”त्यांनी एका भाषणातही म्हटलं होतं की शाहू-फुले-आंबेडकर हा एक विचार आहे, मग छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार नाही का? त्यांच्या विचारांवरच हे महापुरुषांचे विचार आहेत ना? मूळ विचार हा शिवरायांचाच होता ना? शिवरायांची नावं घेतली की मूळ मुस्लीम मतं जातात. मग फंडींग देऊन कुठल्या तरी टोळ्या उभ्या करायच्या आणि मग त्यांच्याकडून शिवाजी महाराजांचे राजकारण करुन घ्यायचं. त्यानंतर मराठा समाज आणि इतर समाज, असा संघर्ष उभा करायचा. त्यानंतर दोघांचाही वापर राजकारण करुन घ्यायचं, मूळ विषय बाजूला ठेवायचा, असा घणाघात राज ठाकरेंनी शरद पवारांवर केला.”, असा आरोपही त्यांनी केला.

🤙 9921334545