नरेंद्र मोदींना तुम्ही बाजुला केलंत तर तुमचं गुजरात गेलं ; या दिवंगत नेत्यांनं बोललेलं हे वाक्य चर्चेत…

गुजरात: गुजरातमध्ये आज पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात आज 19 जिल्ह्यांतील 89 जागांसाठी मतदान होत आहे. अशातच, टीम इंडियाचा रवींद्र जडेजानं दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे.त्याने शेअर केलेला व्हिडीओ पाहून गुजरातपासून महाराष्ट्रात चर्चेला उधाण आलं आहे.

“गुजराती लोकांनो अजुनही वेळ आहे, समजून घ्या”, अशी कॅप्शन देत जडेजाने बाळासाहेब ठाकरे नरेंद्र मोदींवर भाष्य करतेला व्हिडीओ शेअर केला आहे.जुन्या व्हिडीओत बाळासाहेब ठाकरे नरेंद्र मोदींवर भाष्य करताना दिसत आहेत. “माझं हेच म्हणणं आहे की, नरेंद्र मोदी गेले, तर गुजरातही जाईल. जर नरेंद्र मोदींना तुम्ही बाजुला केलंत तर तुमचं गुजरात गेलं. हेच मी अडवानींजवळ बोललेलो आहे”, असं बाळासाहेब ठाकरेंनी या व्हिडीओत म्हटले आहे.जडेजाची पत्नी रिवाबा उत्तर जामनगर मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार आहेत. रिवाबा यांनी २०१९ मध्ये भाजपात प्रवेश केला होता. गुजरातमध्ये मतदान दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यांत 89 जागांवर मतदान होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यांत 93 जागांसाठी मतदान पार पडणार आहे.

🤙 9921334545