कोल्हापूर : शहरात दहशतीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. मागच्या काही दिवसांपासून दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांची व नाहक नागरिकांना त्रास देणाऱ्यांची ही संख्या वाढली आहे. आता अशीच एक घटना समोर आली असून कोल्हापूर पोलिसांनी दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांना चांगलाच चोपला आहे. या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे.
कोल्हापूर शहरातील व्हिनस कॉर्नर हा नेहमीच रहदारीचा आणि वर्दळीचा रस्ता मानला जातो.दरम्यान या व्हिनस कॉर्नर चौकात काल रात्री दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या मद्यपीना पोलिसांनी चांगलाच चोप दिला.व्हीनस कॉर्नर परिसरात एका बारच्या बाहेर नेहमीच दारू पिणाऱ्यांचा उच्छाद होता. स्थानिक नागरिकांनी याची पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार शाहुपूरी पोलिसांनी दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्याना चांगलाच चोप दिला आहे.