राष्ट्रवादीला आणखी एक धक्का ; खा. अमोल कोल्हे भाजपमध्ये प्रवेश करणार?

पुणे : भाजपचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांनी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे भाजपमध्ये आले तर त्यांचं स्वागतच असेल असं विधान केलं आहे.पटेल यांच्या या विधानाचं खंडन करण्या ऐवजी अमोल कोल्हे यांनी सूचक विधान करून एकप्रकारे बळ देण्याचं काम केलं आहे. त्यामुळे अमोल कोल्हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या वावड्या उठल्या आहेत.

भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांनी आढळराव पाटीलच काय अमोल कोल्हेही भाजपमध्ये आले तर त्यांचं स्वागतच आहे, असं विधान केलं होतं. त्यावर अमोल कोल्हे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा, राजकीयदृष्ट्या त्यांच्या विधानात काही गैर नाही, असं अमोल कोल्हे यांनी सांगितलं. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.तसेच, वारा आणि आभाळ बघून शेत कधी नांगरायचे हे आम्ही ठरवत असतो, असंही कोल्हे यांनी सांगितलं. अमोल कोल्हे यांचं हे सूचक विधान आणि भाजपने आतापासूनच शिरूर मतदारसंघात सुरू केलेले दौरे यामुळे अमोल कोल्हे राष्ट्रवादी सोडण्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

🤙 9921334545