
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्याबाबत एक महत्वाची माहिती समोर येत आहे. गेल्या १५ दिवसांपूर्वी विक्रम गोखले यांना तब्येत अचानक बिघडल्यामुळे उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. डॉक्टरांची एक टीम अहोरात्र त्यांच्यावर उपचार करत आहे. मात्र आज अचानक त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याचे समोर आले आहे. उपचाराला प्रतिसाद देत नसल्यामुळे त्यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.
विक्रम गोखले हे गेल्या अनेक दशकापासून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. अभिनयाचा वारसा त्यांना त्यांची आज्जी कमलाबाई गोखले आणि वडील चंद्रकांत गोखले यांच्याकडून मिळाला. नटसम्राट, लपंडाव, टेक ईट इजि, वजीर, गोदावरी, आघात, अनुमती अशा अनेक दर्जेदार चित्रपट आणि नाटकांमधुन त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.विक्रम गोखले यांनी मराठी सृष्टीच नव्हे तर हिंदी सृष्टीला देखील भरीव योगदान दिलेले आहे.
