
ब्युटी टिप्स : केसांची मुख्य समस्या म्हणजे केसात कोंडा होणे. आणि हाच प्रश्न अनेकांच्या मनात येतो “केसात वारंवार कोंडा होतो” तर उपाय काय? तर हे घ्या घरगुती उपाय
आवळ्यात असलेलं कॅरोटीन आपले केस निरोगी ठेवते. म्हणून केसांना पोषण देण्यासाठी खूप पूर्वीपासून आवळा तेल लावले जाते. तुळस आणि आवळ्याची पेस्ट बनवून आपण केसांना मसाज करू शकता. मसाजनंतर अर्ध्या तासानंतर केस धुवा. यामुळे डोक्यातील कोंड्याची समस्या सुटेलकेसांत कोंडा झाला असेल तर तेलाची मालिश करण्याचा एक मोठा फायदा आहे.
कोमट तेलाने केलेली मालीश डोक्याच्या स्नायूंना उत्तेजित करते आणि रक्ता भिसरण वाढते. ज्याद्वारे केस निरोगी, दाट, लांब आणि कोंड्यापासून मुक्त होतात. म्हणून आठवड्यातून एकदा तेलाने मालिश करावी. एक चमचा लिंबाचा रस 5 चमचे नारळाच्या तेलात टाकून केसांना हळूवार बोटांनी मालीश करा कोंडा काही दिवसांत निघून जाईल.
लिंबू हे व्हिटॅमिन सी, ए, बी, फॉस्फरस आणि अँटी-ऑक्सीडेंटचा स्रोत आहे. लिंबू आपले केस दाट आणि चमकदार बनवू शकते .
केसांत कोंडा झाला असेल तर कोमट तेलात लिंबाचा रस मिसळा आणि केसांना मालिश करा. यामुळे केस गळणे आणि केस तुटणे थांबेल. याशिवाय तुम्ही लिंबाचा रस पाण्यात मिसळून केस धुवू शकता. किंवा लिंबू हळूवारपणे केसांना घासू शकता.
मेथीमध्ये निकोटीनिक ॲसिड आणि प्रथिने भरपूर असतात, यामुळे आपल्या केसांच्या मुळांना पोषण मिळते. रात्रभर 2 चमचे मेथीचे दाणे पाण्यात भिजवा. त्यांना सकाळी बारीक करून पेस्ट बनवा. ते केसांत लावा आणि 30 मिनिटे ठेवा. नंतर केस धुवा. केसांतला कोंडा घालवण्यासाठी हा घरगुती उपाय खूप प्रभावी आहे. मेथीच्या ह्या उपायाने बआपले केस मजबूत बनतील आणि गळणार नाहीत.
जर डोक्याच्या त्वचेची नियमित साफसफाई होत नसेल तर डोक्यात कोंडा बनतो.
कोंडा होणे ही समस्या केस स्वच्छ न घुतल्यास घाम ग्रंथी मोकळ्या होत नाहीत. म्हणून केसातील कोंडा काढून टाकण्यासाठी केस साफ करणे फार महत्वाचे आहे.
कोरफड गर लावा कोंडा घालवा. एलोवेरा जेल किंवा कोरफड गराने मालिश केल्याने केसांच्या आणि डोक्याच्या त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात.
