सुरुवातीला पत्रकार म्हणायचे दोघेच निर्णय घ्या पण….. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मिश्किल टिपणी

मुंबई : सुरुवातीला काही पत्रकार म्हणायचे तुम्ही दोघेच (मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री) आहात, तोपर्यंत निर्णय घ्या. दुसरे आल्यानंतर निर्णय घेताना अडचणी येतील. मग आम्ही निर्णय घेतले की हे दोघेच मंत्रिमंडळ चालवत आहेत, अशा बातम्याही करायचे, अशी मिश्कील टिप्पणी एकनाथ शिंदे यांनी केली.

मुख्यमंत्री झाल्यावर मला वाटलं की पद्धतशीर काम होईल, पण उलट झालं. आता व्याप आणखीनच वाढल्याचे ते म्हणाले. चार महिन्यांपूर्वी आम्ही सर्वांना बातमीचा मसाला दिला. ते का घडलं, का केलं हे माहीतच आहे. मी मनात काही ठेवत नसल्याचेही ते म्हणाले.एकनाथ शिंदे यावेळी बोलताना म्हणाले की, राजकीय मंडळींप्रमाणेच पत्रकारांना कुटुंबाला म्हणावा तितका वेळ देता येत नाही. मीडियात मोठा बदल होत असल्याने पत्रकारांची जबाबदारी वाढलेली आहे. सोशल मीडियाने बातमीची सत्यता पडताळणी हे एक मोठं आव्हान पत्रकारांसमोर उभं आहे. सोर्स वाढल्यानं अशी परिस्थिती उद्भवली आहे. त्यातून मार्ग काढणं गरजेचं आहे, तो तुम्ही काही प्रमाणात काढताना दिसत आहात.

🤙 8080365706