
सिंहगड: राज्यातील इतर किल्ल्यावर आणि किल्ल्याच्या भोवती असणारा अतिक्रमण हटवण्यात येणार असल्याचेही सांगितलं जात होतं.त्याची सुरुवात आता झाली असून आज पहाटेपासूनच सिंहगड किल्ल्यावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली आहे.
आज पहाटे पहाटेच सिंहगड किल्ल्यावर गॅस कटर डंपर आणि जेसीबी घेऊन वन विभागाचे पथक दाखल झाले. आणि सिंहगड किल्ल्याच्या वाहन तळाजवळ असणाऱ्या हॉटेलवर कारवाई करण्यास सुरुवात झाली. वनविभागाचे अधिकारी कर्मचारी यासाठी सिंहगड किल्ल्यावर दाखल झाले आहेत.
या ठिकाणी अनुचित प्रकार टाळण्यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.दरम्यान दोन दिवसांपूर्वी सिंहगड किल्ल्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांची एक बैठक घेण्यात आली होती. आणि या बैठकीत अतिक्रमण करण्यात आलेल्या हॉटेलवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. सिंहगड किल्ल्यावर तीस वर्षापेक्षा जास्त काळापासून काही हॉटेल आहेत. त्यामुळे अतिक्रमण झाल्यानंतर यातील काही हॉटेल धारकांचे पुनर्वसन देखील करण्यात येणार आहे.
