भारताने रचला इतिहास ; भारताचे पहिले प्रायव्हेट रॉकेट लॉन्च…

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इसरो आज आणखी एक इतिहास रचला आहे.आज भारताने पहिलं खासगी रॉकेट लाँच केलं आहे.

इसरोचं पहिलं प्रायव्हेट रॉकेट श्रीहरीकोटा येथून लाँच करण्यात आलं आहे. भारताचं पहिलं खासगी रॉकेट विक्रम-एस आज सतीश धवन अंतराळ केंद्रांतून अवकाशात झेपावलं आहे. भारतासाठी हे फार मोठं आणि महत्त्वाचं पाऊल आहे. यामुळे अवकाशात भारतासाठी नवा अध्याय सुरु झाला आहे. हे रॉकेट 81 किलोमीटर उंचीवर पोहोचणार आहे. स्काय रूट एअरोस्पेस या कंपनीने या रॉकेट लाँचची तयारी केली आहे.भारताने अंतराळात आज मोठी झेप घेतली आहे. श्रीहरीकोटामधून आज इसरोने पहिल्या खासगी रॉकेटचं प्रक्षेपण केलं आहे. विक्रम-सबऑरबिटल रॉकेट असं या रॉकेटचं नाव आहे. स्काईरूट एयरोस्पेस प्राइवेट लिमिटेड या खासगी कंपनीनं या रॉकेटची निर्मिती केली आहे. 550 किमी वजनाचं हे सिंगल स्टेज स्पिन स्टेबलाइज्ड सॉलिड प्रोपेलेंट रॉकेट आहे.

आज उड्डाण केल्यानंतर हे रॉकेट सुमारे 100 किलोमीटरपर्यंत झेप घेईल आणि त्यानंतर समुद्रात कोसळेल. केंद्रीय अंतराळ मंत्री डॉ जितेंद्र सिंह या प्रक्षेपणावेळी उपस्थित राहणार आहेत.विक्रम-एस सब-ऑर्बिटलमध्ये उड्डाण केलं आहे. ही एक प्रकारची चाचणी आहे. भारताला या मोहिमेत यश मिळाले तर खाजगी अवकाश रॉकेट प्रक्षेपण क्षेत्रात जगातील आघाडीच्या देशांमध्ये भारताचं नाव सामील होईल. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित झाल्यानंतर विक्रम-एस सुमारे 100 किलोमीटर उंचीवर पोहोचेल. या मोहिमेत दोन देशी आणि एक विदेशी ग्राहक असे तीन पेलोड आहेत. विक्रम-एस सब-ऑर्बिटल रॉकेटमध्ये चेन्नईच्या स्टार्टअप स्पेस किड्झ, आंध्र प्रदेशातील स्टार्टअप एन-स्पेस टेक आणि आर्मेनियन स्टार्टअप BazumQ स्पेस रिसर्च लॅबचे तीन पेलोड आहेत.

🤙 8080365706