
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर पुन्हा एकदा कर्णधार बदलाची मागणी होताना दिसतेय. रोहित शर्माचं वय पाहता त्याच्याकडे आता ट्वेंटी-२० संघाची जबाबदारी कायम राहण्याची शक्यता कमीच आहे.त्यात BCCI कडून हार्दिक पांड्या हा टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार असेल, असे संकेत मिळत आहेत.
हार्दिकच्या नेतृत्वाखाली भारताची युवा ब्रिगेड न्यूझीलंड दौऱ्यावर आहे आणि आज पहिला ट्वेंटी-२० सामना खेळवण्यात येणार आहे. त्याआधीच बीसीसीआयकडून ही ब्रेकिंग बातमी समोर आली आहे. २०२४मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या तयारीसाठी बीसीसीआय मर्यादित षटकांच्या या प्रकारात युवा खेळाडूंना पाहत आहे आणि त्यासाठी आतापासूनच त्यांनी कंबर कसली आहे.
रवी शास्त्री मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडवर कडाडले; IPLच्या वेळेस मिळते तेवढी विश्रांती पुरेशी मग…InsideSports ने दिलेल्या माहितीनुसार श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० व वन डे मालिकेआधीच हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदाची अधिकृत घोषणा केली जाईल. रोहित शर्माकडे वन डे व कसोटी संघाचे नेतृत्व कायम ठेवले जाईल. भारतात पुढील वर्षी होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत रोहितकडे वन डे संघाचे आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या सध्याच्या सर्कलपर्यंत कसोटीचे नेतृत्व कायम असेल.
