
थंडीतही त्वचा काळवंडण्याचा त्रास अनेक जणींना होतो. या त्रासावर एक उत्तम घरगुती उपाय म्हणजे गुळाचा फेसपॅक. गुळामध्ये असणारे काही पौष्टिक घटक त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. यामुळे काळवंडलेली त्वचा पुन्हा उजळ आणि फ्रेश दिसू लागते. शिवाय ज्यांना पिंपल्सचा त्रास असतो, त्यांच्यासाठीही हा उपाय विशेष गुणकारी ठरतो.
त्वचेचं टॅनिंग कमी करण्यासाठीत्वचा खूप काळवंडली असेल अशा पद्धतीने गुळाचा फेसपॅक तयार करा. यासाठी एका वाटीत थोडं पाणी घेऊन त्यात गुळाचा खडा टाका आणि तो विरघळून घ्या.
त्यानंतर त्यात मावेल तेवढे बेसन टाका आणि चिमुटभर हळद टाका. हा फेसपॅक चेहऱ्याला आणि मानेला लावा. १० ते १५ मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या. त्यानंतर चोळून चोळून काढून टाका. चेहरा स्वच्छ धुवा आणि त्यानंतर त्वचेला माॅईश्चरायझर लावा.
