
मुंबई : संजय राऊतांच्या वकिलांनी केलेल्या जोरदार युक्तीवादामुळे त्यांची जेलमधून सुटका झाली. राऊतांनी जेलमधून सुटून अवघे काही दिवस झाले असताना त्यांची अडचणी वाढवणारी आणखी ईडीकडून संजय राऊत यांच्या जामिनाला विरोध करणारी सुधारीत याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे.
संजय राऊतांना जामीन मंजूर झाल्यानंतर ईडीने मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. तसेच हायकोर्टात अर्ज दाखल करत राऊतांच्या जामिनाला विरोध करणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी केली होती.महत्त्वाचे म्हणजे कोर्टाने त्यावेळी पीएमएलए कोर्टाच्या निकालाच्या ऑर्डरची प्रत वाचली होती. तसेच हायकोर्टाने देखील संजय राऊतांची अटक बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. परंतु यावेळी हायकोर्टाने याचिकेतील काही चुका दाखवून दिल्या होत्या. त्यामुळे राऊतांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानंतर ईडीकडून मुंबई हायकोर्टात संजय राऊतांच्या याचिकेला विरोध करणारी सुधारीत याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आता नेमके काय होईल याची सर्वांनाच उत्सुकता लागून आहे.
