
मुंबई: हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृती दिन आहे. या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं आहे. साहेब प्रत्येक श्वास तुमच्याचसाठी, प्रत्येक श्वास शिवसेनेसाठी असं म्हणत संजय राऊत यांनी हे ट्विट केलं आहे. संजय राऊत यांचं हे ट्विट चर्चेत आहे.
मध्यंतरीच्या काळात संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळ्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर १०० दिवसांपेक्षा जास्त काळ ते तुरुंगात होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना जामीन मिळाला. त्यांची दिवाळीही तुरुंगात गेली. उद्धव ठाकरे यांनीही संजय राऊत यांचा उल्लेख मुलुखमैदान तोफ असा केला होता. महाविकास आघाडी सरकार आणण्यात संजय राऊत यांचा सिंहाचा वाटा होता. आज बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृतीदिनी संजय राऊत यांनी केलेलं ट्विट चांगलंच चर्चेत आहेत. संजय राऊत यांनी दुसरंही ट्विट केलं आहे.
