पर्वतासन करण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी योग खूप फायदेशीर आहे. योगासनाचे विविध प्रकार शरीरातील अवयवांना अधिक बल देते. आज आपण पर्वतासन या योग संदर्भात माहिती घेणार आहोत. हे आसन करताना आपल्या शरीराची आकृती पर्वताप्रमाणे बनते.

अत्यंत साधे दिसणारे हे आसन आपल्या शरीराला अनेक फायदे देणारे आहे. या आसनाच्या नियमित सरावामुळे फुफ्फुसाचे आणि पोटाचे विकार नाहीसे होतात. पाठदुखीसाठी एक चांगला उपाय म्हणून आपण हे आसन करू शकतो. या आसनामध्ये शरीराचा समतोल साधला जातो त्याचाच फायदा मन एकाग्र करण्यासाठी होतो. यासह या आसनामुळे सांध्याच्या समस्या दूर होतात, स्नायू लवचिक होतात आणि हात पाय देखील मजबूत होतात.पर्वतासन योग कसा केला जातोप्रथम आपल्या आसनावर पद्मासनात बसावे. दोन्ही हातांचा नमस्कार करून छातीजवळ ठेवा. जोडलेले दोन्ही हात हळू हळू डोक्याच्या वर न्या. आपल्या दोन्ही तळहातांची बोटे एकमेकांना चिपकलेली राहतील, तसेच दोन्ही हात आपल्या कानांना चिटकतील आणी सरळवरती ताठ राहतील कोपऱ्यामध्ये वाकणार नाहीत याची काळजी घ्या. दोन्ही हात वर नेताना श्वास आत घ्या. हात वरती ताणल्या गेल्यावर काही वेळासाठी श्वास रोखून धरा.आता हळू हळू दोन्ही हात खाली आणा. हात खाली आणताना हळू हळू श्वास सोडा. या आसनाचा ४ ते ५ वेळा सराव करावा. जेणेकरून या आसनाचा योग्य लाभ आपणास मिळेल.

🤙 8080365706