
गारगोटी : चालू वर्षी बिद्री कारखान्यामार्फत FRP पेक्षा अधिक 500 रुपये उसाला दर मिळावा, या मागणीसाठी बिद्री कारखान्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमवेत शुक्रवार दि.18 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता मुधाळ तिट्टा येथे विरोधी आघाडी मार्फत आक्रमक भूमिका घेत ‘रास्ता रोको’ करणार असल्याचे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.
प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, श्री दुधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने यावर्षीच्या गळीत हंगामाकरीता जाहीर केलेला टनास 3209 रुपये ऊसदर हा कारखान्या एफआरपी प्रमाणेच आहे. बिद्री चा सहजीव प्रकल्प कर्जमुक्त झाला असून त्यातून मिळणारा नफा सभासदांना देणे आवश्यक आहे.
त्यामुळे एफआरपी पेक्षा प्रतिटन 500 रुपये जादा द्यावा असे निवेदन विरोधी आघाडीमार्फत कारखाना प्रशासनास देण्यात आले होत परंतू कारखाना प्रशासनामार्फत याबाबत कोणतीही कार्यवाही केली नसून शुक्रवार दि.18 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता मुधाळ तिट्टा येथे बिद्री कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमवेत रस्ता रोको करणार असल्याचे निवेदन पोलीस ठाणे भुदरगड व मुरगूड यांना देण्यात आले आहे. निवेदनावर गोकूळ संचालक नंदकुमार ढेंगे, माजी संचालक दत्तात्रय उगले, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर, माजी सभापती बाबा नांदेकर, माजी सभापती अरुण जाधव, अशोकराव फराक्टे, बाळासाहेब भोपळे, मदनदादा देसाई, सुभाष पाटील-मालवेकर, बालाजी फराकटे, शिवाजी चौगले, अशोक भांदीगरे, धैर्यशिल भोसले, ए.बी.पाटील सर, सुरेश देसाई, संजय देसाई, बाबुराव खापरे, राजेंद्र पाटील, तानाजी जाधव, अशोक वारके, धोंडीराम पाटील, विश्वनाथ पाटील आदींच्या सह्या आहेत.
