शिवाजी विद्यापीठ निवडणूक ; सुप्टा उमेदवारांनी मारली तीन जागांवर बाजी…

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या निवडणुकीतील मतमोजणी प्रक्रिया आज नऊ वाजता विद्यापीठ परीक्षा भवन येथे सुरू झाली. सिनेटच्या या पहिल्या निकालामध्ये शिवाजी विद्यापीठ पदव्युत्तर शिक्षक संघटनेच्या (सुप्टा) उमेदवारांनी तीन जागांवर बाजी मारली.

या निवडणुकीत विजयी उमेदवारांमध्ये डॉ. शशीभूषण महाडिक (संख्याशास्त्र), शंकर हंगीरगेकर (रसायनशास्त्र), माधुरी वाळवेकर (प्राणीशास्त्र) यांचा समावेश आहे. या उमेदवारांनी विजयानंतर विद्यापीठ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.विविध नऊ अभ्यास मंडळांवरील २७ जागांसाठी ४६ उमेदवारांमध्ये लढत झाली. त्यात विद्यापीठ विकास आघाडी आणि विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा) यांच्यात चुरस रंगली. विकास आघाडीने १४ जागांसह बाजी मारली. ‘सुटा’ला १३ जागा मिळाल्या. विकास आघाडीला इंग्रजी, हिंदी अभ्यासमंडळात प्रत्येकी एक, मानसशास्त्रमध्ये तीन तर ‘सुटा’ला हिंदी इंग्रजी, रसायनशास्त्र, व्यावसायिक अर्थशास्त्र, प्राणीशास्त्रमध्ये दोन आणि अर्थशास्त्रमध्ये १ जागा मिळाली. अभ्यासमंडळाच्या गटानंतर आता अधिसभा-शिक्षक, विद्यापरिषद शिक्षक, नोंदणीकृत पदवीधर या गटांतील मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे.

🤙 8080365706