
कोल्हापूर : हालोंडी सांगली फाटा येथे मराठी फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे -जाधव डंपरच्या धडकेत ठार झाली आहे.
तुझ्यात जिव रंगला या मालिकेसह अनेक नामवंत मालिकेत तिने काम केले होते. काही दिवसांपूर्वी हालोंडी फाटा येथे प्रेमाची भाकरी नावाने हाॅटेल सुरू केले होते. हाॅटेल बंद करुन बाहेर पडताना डंपरने त्यांना उडवले. त्यांचे माहेर राजाराम पूरी येथे आहे. त्या महावीर काॅलेज समोर राहत होत्या.
