
देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर आहेत.अशातच आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही भारतीय तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत.
आजही तेल कंपन्यांनी देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. महत्त्वाचं म्हणजे, आंतरराष्ट्रीय बाजारातही आज कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये कोणताच बदल करण्यात आलेला नाही. ब्रेंट क्रूड 95.99 डॉलर प्रति बॅरल आणि WTI 88.96 डॉलर प्रति बॅरल दरानं विकलं जात आहे.आज देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. तर मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर 106.03 रुपये तर डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईमध्येही पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.
