‘गोकुळ’ म्हणजे सहकार चळवळीचे यश-प्रफुल्ल वानखेडे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्राला सहकार, सामाजिक, औद्योगिक विकासामुळे वैभव प्राप्त झाले आहे. सहकारातील एक अग्रगण्य दूध संघ म्हणून गोकुळचा दबदबा आहे. सहकाराच्या माध्यमातून गोकुळने ग्रामीण जनतेला विशेष करून महिलांना स्वावलंबी करण्याचे प्रभावी काम केले आहे. आर्थिक नियोजनामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट झालेली आहे. यामुळे सहकार चळवळीचे यश म्हणजेच गोकुळ असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. भविष्यात गोकुळ सहकाराच्या माध्यमातून निवृत्ती जगात आपले कार्य सिद्ध करेल असा विश्वास लेखक व उद्योजक प्रफुल्ल वानखेडे यांनी व्यक्त केला. गोकुळ संघाच्या वतीने ‘व्यक्तिगत उन्नती सह संस्थेची प्रगती’ या विषयावर आयोजित व्याख्यान्यावर ते बोलत होते.

पुढे  बोलताना ते म्हणाले कि, कर्मचाऱ्यांना संस्थे बाबत असणारी आस्था, कामावरील निष्ठा, कुशलता व नवीन गोष्टी आत्मसात करण्याची गरज आहे. सहकारी संस्थेमध्ये काम करताना सर्व समावेशक राहणे हे फार महत्त्वाचे आहे. भाषा कौशल्य, पुस्तक वाचन, कामकाजातील स्वातंत्र्य या सर्वबाबी कर्मचाऱ्यांनी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामुळेच स्वतःच्या बरोबर संस्थेची प्रगती कोणी रोखू शकत नाही. कर्मचारी वर्गामध्ये जागरूकता, सांघिक काम करण्याची इच्छा व सर्वात वरिष्ठ व्यवस्थापक पासून ते खालच्या कामगारापर्यंत सर्वत्र स्वकर्तृत्व विषयी जाणीव असणे फार महत्त्वाचे आहे. संस्थेची प्रगती आणि समृद्धी साध्य करण्यासाठी या सर्व बाबी महत्त्वाचे आहेत असे मार्गदर्शन केले.

स्वागत व प्रास्तविक संघाचे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी केले. चेअरमन विश्वास पाटील आणि संचालक अजित नरके यांनी आभार मानले. सूत्रसंचालन एम.पी.पाटील यांनी केले. यावेळी संचालक किसन चौगले,कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील,चेतन नरके, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, सकाळ पब्लिकेशन्स जनरल मॅनेजर अशितोष रामगिर,नदीम रावळ,राहुल वेळापुरे, स्वप्नील पाटील, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

🤙 8080365706