नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टी-२० विश्वचषक २०२२ मधील पहिला उपांत्य फेरीचा सामना आज (बुधवारी) खेळला गेला. हा सामना न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान या दोन संघात झाला. या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडवर ७ विकेट्सने विजय मिळवत टी-२० विश्वचषक २०२२ च्या अंतिम फेरीत पोहचणारा पाकिस्तान पहिला संघ ठरला.

या सामन्यात न्यूझीलंड प्रथम खेळताना न्यूझीलंड संघान १५३ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने १९.१ षटकांत ३ गडी गमावून हे लक्ष्य पूर्ण केले. पाकिस्तान संघाकडून कर्णधार बाबर आझमने अप्रतिम खेळी करत या विश्वचषकातील पहिले अर्धशतक पूर्ण केले आहे. बाबर आझमनंतर मोहम्मद रिझवाननेही आपले अर्धशतक पूर्ण केले.