कोल्हापूर (प्रतिनिधी) :मिरज-पंढरपूर महार्गावर जुनोनी (ता.सांगोला) येथे काल (सोमवारी) निघालेल्या पायी दिंडीत भरधाव कार घुसल्याने झालेल्या अपघातात कोल्हापूर जिल्ह्यातील सात जणांचा मृत्यू झाला. या सात पैकी पाच जणांवर आज (मंगळवारी) सकाळी जठारवाडी (ता.करवीर) येथे माळावर सामूहिक तर दोघांवर वळीवडे (ता.करवीर) येथे शोकाकुल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान,अंत्यसंस्कारावेळी उपस्थितांना अश्रु आवरता आले नाहीत. यावेळी राजकीय क्षेत्रातील व्यक्तींसोबत परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी सरपंच नंदकुमार खाडे,आ.पी.एन पाटील,माजी आ.चंद्रदिप नरके,अमल महाडिक, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार, गोकुळ संचालक बाबासाहेब चौगले, बाळासाहेब खाडे, डॉ.किडगावकर,प्रदिप पाटील-भुयेकर, राष्ट्रवादी करवीर अध्यक्ष संभाजी पाटील आदी उपस्थित होते.
