टीम इंडियाची फलंदाजीला सुरवात!

नवी (वृत्तसंस्था): भारत आणि नेदरलँड मध्ये आज (गुरुवारी) टी२० विश्वचषक २०२२ मधील सामना होत आहे. सिडनी क्रिकेट मैदानावर (एससीजी) हा सामना खेळला जात आहे. दरम्यान,नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

दोन्ही संघ प्रथमच टी२० सामना खेळणार आहेत. याआधी, २००३ आणि २०११ विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघांनी दोन वनडे सामने खेळले आहेत आणि दोन्ही प्रसंगी भारताने नेदरलँड्सचा पराभव केला आहे. अशा स्थितीत नेदरलँडला हरवणे भारतासमोर मोठे आव्हान नसले तरी रोहितच्या संघाला येथे मोठा विजय मिळवायचा आहे. विशेष म्हणजे जेव्हा-जेव्हा भारताने विश्वचषकामध्ये नेदरलँड्सचा पराभव केला आहे, तेव्हा टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली आहे. २०११ मध्ये भारत चॅम्पियन बनला होता, तर २००३ मध्ये फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला होता.

🤙 9921334545