आता आमदार झाल्याशिवाय माघार घेणार नाही : ए. वाय. पाटील

सोळांकूर (प्रतिनिधी) : गेल्या २७ वर्षांच्या राजकारणात कार्यकर्त्यांच्या परिश्रमावर आणि विश्वासावर मी घडलो व वाढलो नेतृत्वाने वार्‍यावर सोडले असले तरी कार्यकर्त्यांच्या हृदयात माझे स्थान अढळ आहे. म्हणून कोणताही निर्णय घाईगडबडीत न घेता आपल्यावर प्रेम करणाऱ्या शेवटच्या कार्यकर्त्यालाही विश्वासात घेऊन येत्या चार दिवसांत योग्य तो निर्णय घेईन. कार्यकर्त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता आमदार झाल्याशिवाय माघार घेणार नाही, अशी घोषणा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी सोळांकूर (ता. राधानगरी) येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली.

ए. वाय. पाटील राष्ट्रवादीत अस्वस्थ असल्याच्या आणि ते मुख्यमंत्री शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर सोळांकूर येथे प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यातील विविध गावांतील ए वाय पाटीलसमर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजच्या मेळाव्यात ते काय निर्णय घेणार याची संपूर्ण जिल्हाभर चर्चा होती.यावेळी अनेक कार्यकर्तानी आपल्या मनोगतातून आक्रमकपणे भावना व्यक्त केल्या

राष्ट्रवादी पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून जिल्हाभर कार्यकर्त्यांची भक्कम फळी उभी केली. पक्षाच्या वाढीसाठी अतोनात प्रयत्न करुनही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कडगाव येथील कार्यक्रमात राधानगरी विधानसभेच्या उमेदवारीची परस्पर घोषणा केली ही मला दुःखदायक घटना वाटली.अजून मी किती सहन करायचे मला नेहमीच बेदखल करणार असाल तर माझ्या राजकीय भवितव्यासाठी व कार्यकर्ताना आधार देण्यासाठी वेगळा निर्णय घ्यावा लागेल.

प्रास्ताविक गोकूळचे संचालक प्रा. किसन चौगले,यांनी केले यावेळी नेताजी पाटील, भिकाजी एकल,विनय पाटील, फिरोजखान पाटील, मोहन पाटील, सर्जेराव पाटील,एकनाथ पाटील, दिलिप कांबळे, शिवाजी पाटील, मानसिंग पाटील, अमर पाटील, राजू कवडे, आर वाय पाटील, विलास हळदे,दिपक पाटील, नानासो पाटील, बाबुताहिर ताशिलदार,वाय डी पाटील,शिवाजी भाट, बाळासो कामते,बाळासो धोंड,अतुल नलवडे,वीरेंद्र देसाई,अशोक साळोखे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन शंकर देसाई यांनी केले तर आभार युवराज वारके यांनी मानले.

मुश्रीफांवर आई-वडिलाप्रमाणे प्रेम, केपीना हनुमानासारखी साथ

१९९५ पासून मी सक्रिय राजकारणात आहे. त्यावेळेपासून मुश्रीफांना मी आई-वडिलाप्रमाणे प्रेम दिले. त्यांनीही मला वडिलभावाप्रमाणे जपले पण त्यांनीही आता आमच्या मेहूण्या-पाहूण्याचा वादात हात टेकले आहेत.मग मी न्याय कुणाकडे मागू असे म्हणत केपीना त्यांच्या प्रत्येक निवडणूकीत सारथ्याची भूमिका पार पाडली. प्रत्येकवेळी मला ते यावेळी मी निवडणूक लढवतो पुढील वेळी तुम्हाला संधी देतो असा शब्द द्यायचे. परंतु प्रत्यकवेळी माझी फसवणूक झाली तरीपण मी रामभक्त हनुमानाप्रमाणे साथ देत आलो.आता मी राहू शकत नाही.

मेळाव्यापूर्वी नवीद मुश्रीफ भेटीसाठी सोळांकूरात दिवाळीच्या शुभेच्छा देण्याचा निमित्ताने नवीद मुश्रीफ यांनी मेळाव्यापूर्वी सकाळीच ए वाय पाटील यांच्या घरी त्यांची भेट घेऊन पक्ष न सोडण्याची विनंती केली व वरिष्ठाबरोबर चर्चेतून तोडगा आपण नक्की काढू असे आश्वासन दिले.

 
🤙 8080365706