मधमाशांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू !

आजरा (प्रतिनिधी) : मधमाशांच्या हल्ल्यात मेंढोली (ता.आजरा) शेतकऱ्याचा मृत्यू झाला. नानू जोतिबा कोकीतकर (वय ८०) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते शेळी चारण्यासाठी गेले असता मधमाश्यांनी सहा शेळ्यांसह त्यांच्यावर हल्ला केला.

मेंढोली येथील “काळवाट” नावाच्या शेतात नानू कोकितकर शेळ्या चारण्यासाठी काल (शुक्रवारी) गेले होते. नेहमीप्रमाणे आजऱ्याचा शुक्रवारी आठवडा बाजारादिवशी ते घरी न येता शेतातच थांबत होते. आज सकाळी घरी न आल्याने त्यांची शोधाशोध सुरू झाली. ते शेतातील घरात मृतावस्थेत आढळून आले. सकाळपर्यंत त्यांच्या मृतदेहाशेजारी मधमाशा घोंगावत होत्या. शेळ्याही  मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

🤙 9921334545