मुंबई (वृत्तसंस्था) : उद्धव ठाकरेंची वक्तव्य म्हणजे हताश, अकर्तृत्वत्वान आणि अहंकारी माणसाची बडबड आहे. ठाकरेंकडे फरक पडण्यासारखे शिल्लक काय राहिले आहे. दोन तृतीअंश आमदारांनी बंड केलं असून, त्याचेही ठाकरेंना काही वाटत नाही. घरात बसणाऱ्यांना वादळ आणि पाऊस आल्याने काय फरक पडतो. उद्धव ठाकरेंचे शब्द बापूडे केवळ वारा, याच्यापलिकडे काही नाही, अशा शब्दांत भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरेंना टोमणे मारले आहेत.

शिवसेना ५६ वर्षांची झाली आहे. या ५६ वर्षात शिवसेनेवर अनेक अघात झाले. मात्र, या आघाताने शिवसेना कधी संपली नाही, उलट जोमाने पुढे आली, असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी उरणधील कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटलं.
सुषमा अंधारेंनी प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्णावर टीका केली आहे. त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा कायद्याप्रमाणे नसेल, तर न्यायालयात जावे. त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलू नये,असे प्रत्युत्तर भातखळकर यांनी दिलं आहे