चित्रपट महामंडळासाठी ‘या’ तारखेला होणार मतदान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा निवडणूक कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. धर्मदाय कार्यालयाकडून हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. यावेळी महामंडळाच्या अंतर्गत वादामुळे ही निवडणूक धर्मदाय उपायुक्त कार्यालय घेणार आहे. त्यानुसार या निवडणूक कार्यक्रमाला अंतिम मान्यता मिळाल्यानंतर तो जाहीर करण्यात येणार आहे.

दरम्यान, धर्मदाय उपायुक्त कार्यालयाचे निरिक्षक आसिफ शेख हे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रपट महामंडळाचा निवडणूक कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.

अंतिम मतदार यादी प्रसिध्द – ९ जानेवारी २०२३

उमेदवारी अर्ज दाखल करणे- १० ते १६ जानेवारी

उमेदवारी अर्ज माघारी – १८ ते २० जानेवारी

मतदान – ५ फेब्रुवारी

मतमोजणी – ८ फेब्रुवारी

निवडणुकीसाठी इच्छुकांना तब्बल तीन महिने प्रचारासाठी मिळणार आहेत.

🤙 9921334545