अजित पवार यांना चंद्रकांत पाटील यांचं प्रत्युत्तर

कोल्हापूर प्रतिनिधी :  माझ्याकडे पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद होतं, तर माझ्या नाकी नऊ येत होतं, ते सहा जिल्ह्यांचा कारभार कसा सांभाळणार आहेत? असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला होता.

अजित पवारांच्या या विधानावर आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार हे विरोधी पक्षाचे नेते असल्यामुळे त्यांना असं बोलावं लागतं, हे जरी खरं असलं तरी अजित पवार हे वस्तुस्थिती जाणणारे नेते आहेत, असं मी मानतो. त्यामुळे फडणीवसांकडे सहा जिल्हे दोन वर्षे राहणार नाहीत. ही वेळेनुसार केलेली तडजोड आहे. असं तुम्ही तुमच्या कार्यकाळातही केलं होतं. तुम्ही सहा मंत्र्यांच्या मदतीने तीन महिने सरकार चालवलं होतं. त्यावेळी प्रत्येकाकडे आठ-आठ खाती होती अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटलांनी दिली आहे.

🤙 9921334545