कोल्हापूर प्रतिनिधी : केरळ येथील कोझिकोडे येथे होणाऱ्या २१ व्या राष्ट्रीय ज्युनिअर वुशू अजिंक्यपद स्पर्धेसाठी मोसिन मुजावर आणि आयुष बागे यांची महाराष्ट्र संघामध्ये निवड झाली आहे.

नुकत्याच ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनच्या वतीने शिर्डी येथे २०वी राज्यस्तरीय ज्युनिअर वुशू अजिंक्यपद स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत सांसु प्रकारामध्ये आयुष बागे याने ६० किलो वजन गटात व मोसिन मुजावर याने ८० किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवला. यशस्वी खेळाडूंना महाराष्ट्र महासचिव एस.एस.कटके, कोल्हापूर अध्यक्ष राजगोंडा वळीवडे, सतीश वडणगेकर, सुभाष पासाणा, उदय पाटील यांचे प्रोत्साहन लाभले. तर प्रशिक्षक अविनाश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
