कसबा बावडा (प्रतिनिधी) : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर इंटरडिसीप्लेनरी रिसर्चच्या विद्यार्थीनी माधुरी अनुजे यांना वैद्यकीय भौतिकशास्त्र या विषयामधून विद्यापीठाकडून पीएच.डी. पदवी जाहीर झाली. माधुरी अनुजे यांनी ‘कॅन्सर रेडिएशन थेरपी सेन्सिटायझर’ या विषयावरील प्रबंध सादर केला होता. त्यांना प्रा. डॉ. पद्मजा पावसकर यांचे मार्गदर्शन लाभले.

माधुरी यांचे आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर २ शोधनिबंध, ४ बुक चाप्टर व १ इंडियन पेटंट प्रसिद्ध झाले आहे. . माधुरी अनुजे या विद्यापीठातील कॅन्सर विषयामधून वैद्यकीय भौतिकशास्त्रमध्ये पीएच.डी. करणाऱ्या प्रथम विद्यार्थीनी आहेत त्यांच्या संशोधनानूसार ‘सुपर पॅरामॅग्नेटीक आयर्न ऑक्साइड नॅनोपार्टिकल्स’चा रेडियो सेन्सिटायझर म्हणून वापर करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील कालावधीत ‘कॅन्सर’ रेडिएशन थेरपीमध्ये रेडिएशनचे धोके व दुष्परिणाम कमी करण्यास पर्याय होऊ शकतो. त्यांच्या शोधनुसार नॅनोकणचा वापर करून कोलोरेक्टल कॅन्सर बरा होऊ शकतो.
या यशाबद्दल माधुरी अनुजे यांचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष माजी राज्यमंत्री सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे, बायोटेक विभागप्रमुख डॉ. मोहन करुपाईल यांनी अभिनंदन केले.