श्रीराम संस्थेच्यावतीने महिलांसाठी स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा

कसबा बावडा : येथील श्रीराम विविध कार्यकारी सहकारी (वि.का.स) सेवा संस्थेतर्फे कसबा बावडा येथील महिलांसाठी स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला. आमदार जयश्री जाधव, श्रीराम सोसायटीचे उपसभापती सविता रणदिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलनाने या मेळाव्यास प्रारंभ करण्यात आला.

बावडा परिसरातील महिलांना स्वयंरोजगार आणि शासकीय योजनांबद्दल माहिती मिळावी यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये विविध शासकीय विभाग, बँका, यांच्याकडून वैयक्तिक व बचत गटासाठी असणाऱ्या विविध स्वयंरोजगार, लघुउद्योग उभारणी तांत्रिक आर्थिक बाबी, प्रकल्प तयार करणे, मंजूर करून घेणे आदींसाठी मार्गदर्शन व सहकार्य करण्यात आले.

महिलांनी स्वावलंबी बनावे या हेतूने हा मेळावा आयोजित करण्यात आला. कष्ट करण्याची तयारी महिलांची असते परंतु त्यांना योग्य संधी प्रा्प्त होत नाही. केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. परंतु दुर्दैवाने या योजनांचा फारसा लाभ महिला घेतांना दिसत नाही. आपली भगिनी सक्षम व्हावी, उद्योजक बनावी यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. माझ्या भगिनींनी स्वावलंबी बनण्यासाठी एक पाऊल पुढं टाकवं, दहा पाऊले पुढे येऊन स्वतः मदत करण्याची ग्वाही यावेळी आमदार जयश्री जाधव यांनी उपस्थित महिला भगिनींना दिली.

महिलांना शासानाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावे, त्याची माहिती मिळावी यासाठी विविध बँके आणि महामंडळाचे स्टॉल या ठिकाणी उभारण्यात आले असून या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

बावडा परिसरातील शेतकरी भगिनींनी एकत्रित येत सामूहिक शेती करण्याचे आवाहन यावेळी केले तसेच, बचत गटांनी गारमेंटचा व्यवसाय सुरु करून त्यांनी तयार केलेला शर्ट येत्या दिवाळीला मी स्वतः घालणार* असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी यावेळी सांगितले.