कोल्हापूर (प्रतिनिधी) : माजी मंत्री हसन मुश्रीफ व भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांच्यामध्ये मोठा श्रेयवाद सुरू आहे. एकमेकावरील कुरघुडीच्या राजकारणाला धार अली आहे. दोन्ही गटाकडून कार्यकर्त्यांना आपआपल्या पक्षात घेण्याची चढाओढ सुरू आहे. कागलच्या नगराध्यक्ष माणिक माळी व माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी यांनी समरजितसिंह घाटगे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केल्याने मुश्रीफ गटाला मोठा धक्का बसला आहे.

गेले दोन महिने भाजप राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये प्रवेशाचे राजकारण सुरू झाले आहे. आज गुरुवारी नगराध्यक्ष माणिक माळी व रमेश माळी यांनी समरजितसिंह घाटगे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्याने मुश्रीफ गटाला मोठा धक्का बसला आहे.

समरजितसिंह घाटगे यांनी त्यांचे नागाळा पार्कातील निवासस्थानी स्वागत केले.माणिक माळी या पाच वर्षांपूर्वी कागल नगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीत थेट जनतेतून नगराध्यक्षा म्हणून माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या गटातून नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या आहेत. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुश्रीफ गटातून राजे गटात केलेला प्रवेश म्हणजे मुश्रीफ गटाला मोठा धक्का मानला जात आहे. याआधी मुश्रीफ गटातून राजे गटात माजी नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष आनंदा पसारे,संतोष सोनुले यांनीही प्रवेश केला आहे.
