डी. वाय. पाटील विद्यापीठाला उर्जा साठवणूक पद्धतीसाठी पेटंट


कसबा बावडा ( वार्ताहर) : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागातील संशोधकांनी उर्जा साठवणुकीसाठीसाठी संशोधित केलेल्या ‘अझेमेट्रीक सॉलिड स्टेट सुपरकॅपेसीटर’ पद्धतीला पेटंट जाहीर झाले आहे. विद्यापीठाला मिळालेले हे आठवे पेटंट आहे.

रिसर्च डायरेक्टर सी. डी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधित आणि प्रमाणित केलेल्या या संशोधनासाठी 2020 मध्ये संशोधकांनी पेटंट मिळवण्याबाबत अर्ज केला होता. या शोधाअंतर्गत प्रमाणित केलेली नावीन्यपूर्ण उर्जा साठवणुकीची पद्धत पुढील 20 वर्षासाठी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या नावे पेटंट स्वरुपात संरक्षित केला जाणार आहे.

यासंदर्भात विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. व्ही भोसले यांनी सांगितले, विद्यापीठा अंतर्गत निर्गमित झालेले हे आठवे पेटेंट आहे. विद्यापीठ आणि संशोधकांच्या दृष्टीने ही बाब आनंददायी आहे. जुलै २०२१ मध्ये अभिमत विद्यापीठाला पहिले पेटंटला मिळाले होते. पेटंटमुळे विद्यापीठाच्या संशोधन कार्याला आणखी वेग येईल.

मुख्य संशोधक प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे यांनी सांगित‌ले, ‘सदर शोध पद्धतीद्वारे तयार केलेल्या ‘थिन फिल्म्स’ उर्जा साठवणुकीसाठी बनवले जाणारे विदयुत घटक तसेच सुपरकॅपॅसिटर मध्ये अत्यंत प्रभावी व कार्यक्षम आहेत. या संशोधनामध्ये मुख्य संशोधक प्रा. सी. डी. लोखंडे यांच्यासमवेत संशोधक विद्यार्थी प्रिती बागवडे व तृप्ती घोगरे, कुलसचिव डॉ. वि. वि. भोसले यांचा सहभाग होता.

पेटंट मिळवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व संशोधकांचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष माजी गृह राज्यमंत्री सतेज डी. पाटील, संस्थेचे विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील आणि कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांनी अभिनंदन केले.

🤙 8080365706