मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंळाचा विस्तार उद्या होणार आहे. उद्या सकाळी ११ वाजता शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.

मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळात अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. राजभवनावर नव्या मंत्र्यांना शपथ देण्याची तयारीही जोरात सुरू आहे. तर विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आज बैठक झाली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या सकाळी 11 वाजता राजभवनात मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यासोबतच कॅबिनेट विस्तार देखील होणार आहे. सूत्रांचे असे म्हणणे आहे की, मंत्रिमंडळाबाबत सर्व काही ठरले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील काही तासांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे. आज रात्री शपथविधी होऊ शकतो का? या बद्दलही चाचपणी सुरू आहे.
मंत्रिमंडळ झाल्यानंतर 10 ते 17 ऑगस्ट दरम्यान विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर देखील विधिमंडळात आज अधिकाऱ्यांची तातडीच बैठक बोलावण्यात आली आहे.