राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : मुंबईसह कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढत आहे. हवामान विभागाने १० ऑगस्टपर्यंत सतर्कतेचा इशारा दिला आहे.या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यातील विविध ठिकाणी पाऊस सक्रिय झाला आहे, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यात ११ ऑगस्टपर्यंत सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून नदीकाठी वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी ८ ते १० ऑगस्ट या काळात पाऊस पडण्याची, तसेच कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कोकण किनारपट्टी भागात सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने उसंत घेतलेली होती. पण दोन आठवड्यांच्या ब्रेकनंतर पावसाने पुन्हा एन्ट्री मारली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये प्रचंड मुसळधार पाऊस पडतोय. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात आज आणि उद्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार पाऊसही प्रचंड पडतोय. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात ९ ऑगस्टपासून ऑरेंज अलर्ट असणार आहे.याचा अर्थ पावसाचं प्रमाण काहीसं कमी होईल. पण पाऊस कोसळत राहणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र थोडीसी परिस्थिती वेगळी असणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज आणि उद्यासाठी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.तर त्यापुढच्या तीन दिवसांसाठी येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यासाठी ७ ऑगस्टसाठी येल्लो अलर्ट देण्यात आला होता. पण त्यानंतर पुढच्या चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचाच अर्थ आतापासून पुढचे चार दिवस पालघर जिल्ह्यासाठी महत्त्वाचे आहे.आगामी चार दिवसांमध्ये पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेष म्हणजे पालघर सारखाच येल्लो अलर्ट हा ठाणे आणि मुंबईसाठी देण्यात आला आहे. त्यानंतर पुढचे चार दिवस हे ऑरेंज अलर्ट सांगण्यात आले आहेत. मुंबईसाठी फक्त ११ ऑगस्टला परिस्थिती नियंत्रणात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पुण्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुण्यात आजसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. तर उद्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुढच्या तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.दुसरीकडे कोल्हापूरसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सातारा जिल्ह्यासाठी आज आणि उद्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर त्यापुढच्या तीन दिवसांसासाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे.
धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर, जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता कमी आहे.तर त्यापुढच्या तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे. तिथे फार काही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला नाही. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात ९ किंवा १० ऑगस्टसाठी येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर इतर दिवसांसाठी ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी पुढचे तीन दिवस येल्लो अलर्ट तर १० ऑगस्टसाठी ऑरेंज अलर्ट आणि ११ ऑगस्टसाठी ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूर जिल्ह्यासाठी १० आणि ११ ऑगस्टसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

🤙 9921334545