गांधीनगर : गांधीनगर परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या परप्रांतियांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी शिवसेनेचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी गांधीनगरचे सहायक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले यांच्याकडे केली. यावेळी घुले यांनी लवकरात लवकर आशा गुन्हेगारांना आळा घालू, असे आश्वासन करवीर शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले.

गांधीनगर परिसरात तसेच संपूर्ण उचगांवसह मणेरमळा, सरनोबतवाडी सह अन्य भागात परप्रांतीय लोकांनकडून मोठ्या प्रमाणात टेहाळीणी करून रात्री चोऱ्या करणे व बनावट माल विकणे तसेच काही ठिकाणी मारामाऱ्या असे अनेक प्रकार या भागामध्ये घडताना दिसत आहेत. दाटीवाटीच्या ह्या भागामध्ये सकाळी काही तरी विक्री करण्याच्या बहाण्याने फिरत रहायचे व संध्याकाळी टार्गेट ठिकाणी चोऱ्या करायच्या सदर परप्रांतीय यांची कोणतेही नोंद संबंधीत भागातील पोलीस स्टेशन व ग्रामपंचायतमध्ये नसल्याने मोठ्या घटना घडत आहेत परवा गांधीनगरमध्ये अनेक दुकाने फोडण्यासह हातातील रोकड हिसकावून नेहण्याचे प्रकार या परिसरात घडला आहे. अनेक परप्रांतीय चोर हे धाडस करत आहेत. नोंदी नसल्याने त्यांचा काही ठावठिकाणा मिळत नाही. आपल्या पोलीसस्टेशनमार्फत आपल्या हद्दीतील सर्व ग्रामपंचायतीत मिटींग घेऊन गावामध्ये काहीही नवीन विक्री करत फिरणाऱ्या इसमाचे ओळखपत्र तपासणे व तशी ग्रामपंचायत मध्ये नोंद ठेवणे हे आपल्या मार्फत संबंधीत ग्रामपंचायतींना कळवणे गरजचे आहे. तसेच आपल्या घरामध्ये राहणाऱ्या कुळाची ही आधार कार्ड हे संबंधीत पोलीस स्टेशन किंवा ग्रामपंचायतमध्ये नोंद करण्याच्या सुचना संबंधीत घरमालकांना व्हाव्यात व त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात परप्रांतीय काम करत असतील त्याही कंपनी किंव्हा दुकानांच्या मालकांनी संबंधीत पोलिस स्टेशनला किंवा ग्रामपंचायत मध्ये नोंद ठेवण्याच्या सुचना द्याव्यात ह्या परप्रांतीयांच्या बरोबर बांगलादेशी व नेपाळ मधुन लोंढेच्या लोंढे गांधीनगर बाजार पेठेत येत आहेत त्यांना ना आधार कार्ड, रेशनकार्ड आहे.अशा लोकांचा त्वरीत बंदोबस्त व्हावा अन्यथा भविष्यात येथील भुमी पुत्रांना ह्या घुसखोरी मुळे जगणे मुश्कीलीचे होईल. याबाबत गांर्भीयाने पोलीस यंत्रणेने व स्थानिक स्वराज्य संस्थानी दक्ष रहावे या मागणीचे निवेदन करवीर शिवसेनेच्या वतीने गांधीनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले यांना देण्यात आले.

यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, मा.उपतालुकाप्रमुख विक्रम चौगुले, हिंदुत्ववादी संघटनेचे शरद माळी, राहुल गिरुले, जितु कुबडे, विरेंद्र भोपळे, विनोद रोहिडा, दिपक अंकल, बाळासाहेब नलवडे, शिवाजी लोहार, प्रफुल्ल घोरपडे, दिपक फ्रेमवाला, दिपक पोपटाणी, योगेश लोहार, पै. बाबुराव पाटील, कैलास जाधव आदी उपस्थित होते.