स्वामी विवेकानंद ट्रस्टच्यावतीने एक राखी जवानासाठी उपक्रम

कोल्हापूर: कोल्हापूर येथील श्री स्वामी विवेकानंद ट्रस्टच्यावतीने कारगिल युद्धापासुन गेली 23 वर्षे एक राखी सीमेवरील जवानांनसाठी हा उपक्रम राबवला जातो.

फक्त युद्धाच्यावेळी नव्हे तर 24 तास जीवावर उधार होऊन देश रक्षण करणाऱ्या सैनिकांचे नैतिक बळ वाढवण्यासाठी हा उपक्रम राबवला जातो. शाळा, बचत गट व अनेक संस्थांच्या वतीने हजारो राख्या संकलित करून ते सीमेवर पाठवल्या जातात. यावर्षीही हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती या ट्रस्टचे किशोर घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी राजेंद्र मकोटे, कमलाकर कीलकिले आदी उपस्थित होते.