रूकडी (प्रतिनिधी) : “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत “हर घर तिरंगा’ अभियान यशस्वी होण्यासाठी पाच हजार तिरंगा ध्वजांचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण माजी सभापती वंदना मगदूम यांनी दिली.

भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या ‘ हर घर तिरंगा” अभियान राबवण्यात आले आहे. जिल्ह्यात हे अभियान यशस्वी करण्यासाठी समाजातील दानशूर व सेवाभावी संस्थांनी तसेच लोकप्रतिनिधी पुढाकार घेऊन सर्वसामान्य गरीब व गरजू नागरिकांना ध्वज उपलब्ध करून द्यावेत, असे जिल्हा प्रशासनामार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आव्हान केले होते.

या आव्हानाला प्रतिसाद म्हणून रुकडी, चोकाक अतिग्रे, साजणी, मुडशिंगी, तिळवणी माणगांववाडी या गावांमध्ये मोफत पाच हजार तिरंगा ध्वज वाटप करण्यात येणार आहेत.
