रेल्वे चाईल्ड लाईन कोल्हापूरतर्फे जनजागृती

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील छत्रपती महाराज टर्मिनस कोल्हापूर येथे राष्ट्रीय मानवी तस्करी विरोधी जागृती दिवसाचे औचित्य साधून सांगली मिशन सोसायटी संचलित रेल्वे चाईल्ड लाईन कोल्हापूरतर्फे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी रेल्वे प्लॅटफॉर्मवर जागतिक मानवी तस्करी विरोधी दिनाबाबत प्रवाशांना मानवी तस्करीची माहिती देऊन त्यांना त्याबाबत कोणत्या यंत्रणेची मदत घ्यावयाची बाबत माहिती देण्यात आली. तसेच चाईल्ड लाईन कोल्हापूर टीम मार्फत कोल्हापूर रेल्वे स्टेशन परिसरात रॅली काढून मानवी तस्करी विरोधी पोस्टरने घोषणा व जनजागृती करण्यात आली.

यावेळी स्टेशन प्रबंधक विजय कुमार यांनी कोल्हापूर रेल्वे स्टेशन तस्करी मुक्त करण्यासाठी सर्व यंत्रणेने मिळून काम गरजेचे आहे तसेच बाल तस्करी रोखण्यासाठी रेल्वे चाईल्ड टीमशी संपर्क साधण्याचे आवाहन केले केले.
रेल्वे पोलिस फोर्स कोल्हापूरचे निरीक्षक मांझी यांनी तस्करी रोखण्यासाठी पोलिस यंत्रणा कायम सज्ज राहील तसेच तस्करी रोखण्यासाठी प्रवाशांनी एखादा अनुचित प्रकार घडल्यास जवळच्या पोलिस यंत्रणेला कळविण्याचे आवाहन केले. यावेळी यमराज, मुख्य तिकीट निरीक्षक सचिन , लोहमार्ग पोलीस उपनिरीक्षक सदा पाटील, आयआरसीटीसी मॅनेजर विजय कुंभार, सांगली मिशन सोसायटीचे मॅनेजर जॉन कदम, रेल्वे चाईल्ड लाईन प्रकल्प समन्वयक अभिजीत बोरगे व टीम मेंबर आदी रेल्वे कर्मचारी उपस्थित होते.