कोल्हापूर (प्रतिनिधी) शिवसेना पक्षामध्ये ज्या पद्धतीने आताच्या स्थितीला ज्या घडामोडी चालू आहेत, याला अनुसरून आज कोल्हापूर युवा सेनेच्यावतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनोख्या पद्धतीने वृक्षारोपण करण्यात आले.

खाजे जे या कठीण व संघर्षमय काळात मुळच्या शिवसेनेत कट्टर राहिले, ते कट्टर खासदार संजय राऊत, गजानन कीर्तीकर, अनिल देसाई, अरविंद सामंत, विनायक राऊत, राजन विचारे, प्रियांका चतुर्वेदी
तसेच कट्टर आमदार अनिल परब, आदित्य ठाकरे, सचिन अहिर, अजय चौधरी, वैभव नाईक, सुनील राऊत, प्रकाश फातर्फेकर, सुनील प्रभू या सर्व पक्षाशी कट्टर राहिलेल्या खासदार व आमदार यांची नावे प्रत्येक लावलेल्या झाडाला देण्यात आली.
तसेच या सर्व झाडांचे संगोपन युवासेना करेल असे सर्व पदाधिकारी यांनी ग्वाही दिली . हा उपक्रम शिवाजी पेठेतील न्यू हायस्कूल कोल्हापूर पेटाळा इथं करण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन युवासेना जिल्हा युवा अधिकारी मंजित माने व सर्व पदाधिकारी यांनी केले, याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, शाळेचे मुख्याध्यापक के, इ, पवार, शहर प्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी,उपजिल्हा प्रमुख अवधूत साळोखे,समन्व्यक हर्षल सुर्वे, महिला उपजिल्हा संघटक स्मिता सावंत,तसेच युवासेनेचे वैभव जाधव, संतोष कांदेकर, सनराज शिंदे, शेखर बारटक्के, लतीफ शेख, अवदेश करंबे, विशाल गायकवाड,रोहित वेढे, चैतन्य देश पांडे, कीर्तिकुमार जाधव,निलेश सूर्यवंशी, सार्थक कोळेकर, प्रथमेश देशिंगे, रघुनाथ भावे, इंद्रजित सुतार,केदार जोशी,तसेच युवतीसेनेच्या पूनम पाटील, स्वेता सुतार, तेजू चौगुले, सानिका दामूगडे, सिद्धी दामूगडे, वैष्णवी खुरदरे आदी उपस्थित होते.