.मुंबई (वृत्तसंस्था) : जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाने मागच्या दोन दिवसांत थोडी उसंत घेऊन परत पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

येत्या तीन ते चार दिवसांत राज्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून काही विविध ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. उद्या रविवारी पावसाचा प्रभाव थोडा जास्त राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. विदर्भात आज-उद्या जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्याच्या काही भागातही पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. विदर्भात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे. तर विदर्भातील वाशिम, अकोला, भंडारा, नागपूर, अमरावती, वर्धा, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांत पावसाचा इशारा दिला