कोल्हापूर (प्रतिनिधी) : लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या करवीर नगरीत कित्येक वर्षे पारंपारिक पद्धतीने त्र्यंबोली यात्रेचे आयोजन करण्याची परंपरा आजच्या २१ व्याशतकात सर्व शहरातील तालीम तरुण मंडले ,संस्था यांनी अखंडितपणे जपलेली आहे. याचे जिवंत उदाहरण म्हणजे आज करवीर नगरीत आपले ग्रामदैवत त्र्यंबोली देवीच्या उत्सवामध्ये नाहून निघालेली दृश्य करवीर नगरीच्या चारही दिशेच्या रस्त्यावरती विविध ठिकाणी निदर्शनास येत आहेत.

१८८१ साली शाहू महाराजांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या सुबराव गवळी तालीम या संस्थेने वाजत गाजत पारंपारिक पद्धतीने पंचगंगा नदीतून नवीन पाणी पूजन करून पारंपरिक वाद्यांच्या गजरात लेझमीच्या साथीने लेझीम खेळत करवीर नगरीच्या रस्त्यांवरून आणले जाते तसेच कोल्हापूरातील वाघाची तालीम ,बालगोपाल तालीम,पाटाकडील तालीम, दिलबहार तालीम, हनुमान तालीम (राजारामपुरी) अश्या नामवंत तालीम मंडळ यांनीही हि परंपरा जपलेली आहे. या यात्रेसाठी बाहेर गेलेली घरातील मंडळी देखील आवर्जून घरी येतात. अशा या त्र्यंबोली यात्रेचे महत्व कोल्हापूर शहरातील प्रत्येक अठरा पगड जातींच्या समजाला, त्यातील प्रत्येक व्यक्तीला माहित असून त्याच कारणाने आजच्या २१ व्या सर्व करवीरनगर वासियांना या यात्रेत सहभागी होण्याकरिता कोणत्याही प्रकारचे निमंत्रण तालीम संस्थांकडून न देता घरोघरी प्रत्येक व्यक्ती या सणामध्ये उत्साहाने सहभागी होऊन तालीम संस्थेने ठरवलेली वर्गणी कार्यकर्त्याच्या त्याच्याकडे जमा करतात अशा या उत्सवातील वर्गणीतून तालीम संस्था आपल्य त्र्यंबोली यात्रेसाठी देवीला अर्पण केलेल्या बकऱ्यांपैकी काही मटणाचा वाटा प्रसाद म्हणून वर्गणी दिलेल्या घरामध्ये पोहोच करतात. ज्या संस्थेचा उत्सव ज्या दिवशी असतो त्या दिवशी त्या संस्थेच्या परिसरातील घरोघरी मांसाहारी पद्धतीचे जेवण हमखास असते . त्याचबरोबर त्या घरातील मंडळी आपल्या नातेवाईकांना ज्या पद्धतीने ग्रामीण भागामध्ये जत्रा किंवा म्हाई असते अशा पद्धतीने आपल्या घरी जेवणासाठी आमंत्रित करून हा उत्सव आनंदाने पार पाडतो. अशा उत्सवाचे पारंपारिक पद्धतीने जतन करून वाघाची तालीम ,बालगोपाल तालीम,पाटाकडील तालीम, दिलबहार तालीम, हनुमान तालीम (राजारामपुरी) सुबराव गवळी तालीम संस्थेने नूतन युवा कार्यकर्त्यांनी ही परंपरा अखंडित ठेवली आहे.
अवधूत सावेकर,शुभम मस्कर, केतन गोंदकर, तारक सुतार, निहाल शेख, श्रीधर पाटील, इंद्रजीत भोंगाळे,शिरीष पाटील, प्रसाद शेडे, अमित कारंडे,कुणाल शिंदे, ओमकार कोळेकर,शैलेश पाटील, हर्षद घाटगे,अमित गवळी,अमोल वरक.
साजरीअवधूत सावेकर,शुभम मस्कर, केतन गोंदकर, तारक सुतार, निहाल शेख, श्रीधर पाटील, इंद्रजीत भोंगाळे,शिरीष पाटील, प्रसाद शेडे, अमित कारंडे,कुणाल शिंदे, ओमकार कोळेकर,शैलेश पाटील, हर्षद घाटगे,अमित गवळी,अमोल वरक.