शिंदेसेना विरुद्ध शिवसेना यांच्यात कुरघोडीची लढाई सुरू

मुंबई वृत्तसंस्था – युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई देसाई यांची एकनाथ शिंदे यांनी पदावरून हकालपट्टी केली आहे. त्यांच्या ऐवजी शिंदे गटातील किरण साळी यांची युवासेनच्या राज्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदेसेना विरुद्ध शिवसेना यांच्यात कुरघोडीची लढाई सुरू झाल्याचे चित्र दिसते.

वरुण सरदेसाई हे आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयांमधील एक म्हणून ओळखले जातात. ते आदित्य ठाकरेंचे मावसभाऊ देखील आहे. विधानपरिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या सर्व कामकाजात त्यांनी महत्त्वाची भूमिका राबवली होती. त्यांच्यावर एकनाथ शिंदेंनी आरोप केले होते. आक्रमकपणे आंदोलन असो की, महाराष्ट्रभर युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी, आदित्य ठाकरेनंतर युवासेनेचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिल्या जात होते. मात्र त्यांच्या हकालपट्टीने एकप्रकारे आदित्य ठाकरेंनाच शिंदे गटाकडून आव्हान देण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.

उद्धव ठाकरेंनी बंडखोरांवर कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी सुरू केली. गेली अनेक दिवस बंडखोराची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली अशा बातम्या पक्षाच्या मुख्यपत्रातून देण्यात येत आहे. यात किरण साळी, राजेंद्र जंजाळ यांची युवासेनेतून हकालपट्टीकरण्यात आली, तर शिवसेनेतून आमदार संतोष बांगर, आमदार सुहास कांदे यांच्यावर शिवसेनेविरोधात काम केल्याचा आरोप करत त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.

युवासेनेच्या अध्यक्ष पदासाठी वरुण सरदेसाई यांचे नाव चर्चेत होते. आदित्य ठाकरेंवर मंत्रिमंडळाची जवाबदारी असताना त्यांना महाराष्ट्रभर युवासेनेचे जाळे तयार करणे किंवा अनेक युवासेनोच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणे शक्य होत नव्हते. यावेळी त्यांच्यावर युवासेनेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्याचा माणस होता. मात्र, त्यांनापक्षातून असलेल्या विरोधामुळे ही नियुक्ती झाली नव्हती. मात्र ठाकरे कुटुंबियाबाहेरील व्यक्तिचा शिवसेनेत आणि युवासेनेत वाढणारा दबदबा यामुळे त्यांना मोठा विरोध होत होता.

🤙 8080365706