नवी दिल्ली : पश्चिम बंगालचे राज्यपाल जयदीप धनखड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी धनखड यांच्या नावाची घोषणा केली.

जगदीप धनखर यांनी आज पंतप्रधान मोदींची भेट घेतली. भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत पंतप्रधान मोदीही उपस्थित होते.
धनखड 1989-91 दरम्यान राजस्थानमधील झुंझुनू (लोकसभा मतदारसंघ) येथून ते खासदार होते. ते 1993-98 दरम्यान 10 व्या विधानसभेत राजस्थानमधील किशनगड, राजस्थान येथून विधानसभेचे माजी सदस्य (आमदार) आणि राजस्थान हायकोर्ट बार असोसिएशन, जयपूरचे माजी अध्यक्ष होते. 30 जुलै 2019 रोजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी त्यांची पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली होती. धनखर यांचा जन्म 18 मे 1951 रोजी राजस्थान राज्यातील किठाना या छोट्याशा गावात झाला. त्यांनी आपलं शालेय शिक्षण सैनिक स्कूल, चित्तौडगड येथून पूर्ण केलं. त्यानंतर नंतर राजस्थान विद्यापीठ, जयपूरमधून पदवी प्राप्त केली.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची नामांकन प्रक्रिया 19 जुलैपर्यंत होणार आहे. त्यानंतर 20 जुलै रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. 22 जुलैपर्यंत नावनोंदणी केलेल्या उमेदवारांना त्यांची नावं मागे घेता येतील. त्यानंतर 6 ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे.