खांडसरी ते शिंगणापूर परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिंगणापूर(ता.करवीर) येथील खांडसरी ते  विद्यानिकेतन या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्घंधी पसरली असून यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना साथीच्या रोगांना सामोरे जावे लागत आहे.

गेले कित्येक दिवस या परिसरात भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर होत असून देखील या गंभीर बाबीकडे ग्रामपंचायत नागदेववाडी,शिंगणापूर, महानगरपालिका यांना याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. यामुळे या परिसरातील हॉटेल्स, चिकन-मटन दुकाने यांच्यामुळे खांडसरी परिसरात मोठ्या प्रमाणात हॉटेल, मटन दुकाने यातील शिल्लक राहिलेले

मटणाचे तुकडे उघड्यावर टाकून दिले जातात. यामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरत आहे. पण हा परिसर कोणाच्या हदीत येतो हेच ग्रामपंचायतींना व महापालेकेला माहित आहे कि नाही हेच कळायला येथील नागरिकांना मार्ग नसल्यामुळे या परिसरातील दुर्गंधीची जबाबदारी कोणावर आहे हेच येथील रहिवाशी असणाऱ्या लोकांना कळेना.

तसेच परिसरातील नवीन निर्माण होणाऱ्या उपनगरांच्या रहिवाशांचासुद्धा मोठ्या प्रमाणात त्रास होऊ लागला आहे. या उपनगरातील राहणारे लोकही  घरातील कचरा रस्त्यावर बिनधास्त टाकून जातात. त्यांच्यावर हि कोणाचे वचक नाही असे दिसून येते. तरी या परिसराकडे कोणीतरी लक्ष्य द्यावे हि अपेक्षा न्यूज मराठी २४ कडे येथील नागरिकांनी बोलून दाखवली. रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांनाही  भटक्या कुत्रांचा धोका निर्माण झाला आहे. शाळकरी मुला-मुली, रात्रीच्या वेळेला जाणाऱ्या दुचाकी स्वारांवरही भटकी कुत्री पाठलाग करतात.

त्यामुळे या खांडसरी ते शिंगणापूर फाटा दरम्यान कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. तरी आता साचलेला कचरा आहे तो काढून टाकून होणाऱ्या  साथीच्या आजारावर अटकाव करावा नाहीतर येथील राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होण्यास वेळ लागणार नाही. हॉटेल चालक आणि मटण दुकान चालक यांच्यामुळे हा परिसर आरोग्याच्या दृष्टीने दुर्गंधीमय झालेला आहे. हॉटेलचा कचरा आणि मटण दुकानातील कचरा उघड्यावरच टाकल्याने शहराच्या प्रवेशद्वारावरच दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून यांच्यावर ग्रामपंचायत किवा महापालिकेने कठोर कारवाई करण्यात यावी यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.