एस. एम. पाटील म्हणजे गोकुळ’चे चालते बोलते माहितीपुस्तक : विश्‍वास पाटील

कोल्‍हापूर : एस. एम. पाटील म्‍हणजे गोकुळचे एक चालते बोलते माहिती पुस्‍तक होते. १९६३ पासुन संघाचा इतिहास माहित असणा-या अधिकाऱ्याच्या पैकी एक अधिकारी होते. त्‍यांच्‍याकडे असणारे बौध्दिकज्ञान, जिज्ञासुवृत्‍ती, कार्यकौशल्‍य यामुळे त्‍यांना संघ कामकाजातील विषयाचे आकलन त्‍यांना त्वरित होत असे, त्यामुळे  संघाच्‍या निर्णय प्रक्रिया योग्‍य व अचुक होण्‍यासाठी त्‍यांच्‍या कौशल्‍याचा उपयोग झाला आहे, असे प्रतिपादन गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील यांनी केले.

गोकुळ संघाचे बोर्ड सेक्रेटरी एस. एम. पाटील हे ३८ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर निवृत्त झाल्याबद्दल संघाच्या वतीने चेअरमन विश्‍वास पाटील यांच्‍या हस्‍ते व संचालक मंडळाच्‍या उपस्थितीत सत्‍कार करण्‍यात आला.

सत्‍कारास उत्‍तर देताना एस. एम. पाटील म्‍हणाले, गोकुळमुळे माझ्या परिवाराचे ‘गोकुळ’ झाले असून त्‍याचे मला समाधान आहे. भविष्‍यात गोकुळची प्रगती दिपस्‍तंभासारखी सदैव तेवत राहील.

        यावेळी माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक अजित नरके, सुजित मिणचेकर, बाळासो खाडे यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी केले. व आभार शशीकांत पाटील-चुयेकर यांनी माणले.

        यावेळी जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळ, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजीत तायशेटे, अजित नरके,नविद मुश्रीफ, शशीकांत पाटील-चुयेकर,किसन चौगले,रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश  पाटील, सुजित मिणचेकर,अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, तज्ञ संचालक युवराज पाटील, संचालिका अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.