राजर्षि शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस बँकेच्या राजर्षी शाहू कृतज्ञता पर्व ठेव योजनेचा शुभारंभ

कोल्हापूर : राजर्षि शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस को-ऑप. बँकेमार्फत राजर्षि शाह कृतज्ञता पर्व ठेव योजनेचा” शुभारंभ, “पद्माराजे पारितोषिक” वितरण व “सेवानिवृत्त सभासद सत्कार” समारंभ, तसेच मोफत आरोग्य तपासणी, डोळे तपासणी व चष्मा वाटप शिबीर कार्यक्रम माजी मंत्री, आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्याहस्ते, जिल्हाधिकारी राहुल रेखावार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्केट यार्डातील शाहू सांस्कृतिक मंदिर येथे उत्साहात झाला.

बँकेचे अध्यक्ष शशिकांत तिवले यांनी प्रास्ताविक करुन बँकेच्या प्रगतीदर्शक आढाव्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. तिवले यांनी बँकेने “105 वर्षे पूर्ण ” करुन ” 106 व्या वर्षात पदार्पण ” केल्याचे सांगितले. शतकोत्तर वाटचाल करणारी आपली बँक ही राज्यातील पगारदार नोकरांची प्रथम क्रमांकाची सहकारी बँक आहे. बँकेने रिझर्व्ह बँकेचे सर्व निकष पूर्ण केले असलेचे नमूद करुन मार्च 2022 अखेरचे सांपत्तिक स्थितीची माहिती दिली. बँकेने वृक्षारोपण, दुष्काळ ग्रस्तांना निधी, बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियान राबविले असून सामाजिक बांधिलकी जोपासली असलेचे नमूद करून पारितोषिक पात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच सेवानिवृत्त सभासदांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

बँकेचे अध्यक्ष शशिकांत तिवले यांचे हस्ते आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांचा, बँकेचे ज्येष्ठ संचालक व गटनेते रविंद्र व. पंदारे यांचे हस्ते राहुल रेखावार यांचा, संचालक मधुकर श्री. पाटील यांचे हस्ते संजयसिंह चव्हाण या प्रमुख पाहुण्यांचा शाल व रोपटे देऊन सत्कार केला.

बँकेचे ज्येष्ठ संचालक व गटनेते रविंद्र व पंदारे यांनी मनोगतामध्ये राजर्षि शाहू महाराज यांचे प्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे सुसंस्कृतपणा, व्यावहारिकपणा, दूरदृष्टी, अखंड सावधानता, निःस्वार्थीपणा, कर्तव्यनिष्ठा आदी गुणांमुळे राजर्षि शाहू महाराज यांचे नाव आधुनिक काळावर सुवर्णाक्षरांनी कोरले गेले असल्याचे नमूद केले. त्याचबरोबर राजर्षि शाहू महाराज यांचे करवीर संस्थानात प्रशासनाची धुरा सांभाळणारे व बँकेचे संस्थापक कै. नामदार भास्करराव जाधव यांना अभिवादन करून त्यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार कामकाज करत राहणार असल्याचे नमूद करून कै. नामदार भास्करराव जाधव यांचा आदर्श सर्व पारितोषिक पात्र विद्यार्थी / विद्यार्थीनींनी घ्यावा व त्यांचे पालकांनी सुध्दा शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे जाणून जागरूक रहावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील म्हणाले, सहकारी बँकाशी सर्वसामान्यांशी जिव्हाळयाचे नाते आहे. रिझर्व्ह बँकेचे बदलत्या धोरणाचा अवलंब करीत सहकार अपला पाहिजे असे विशेषत: नमूद केले. बँकेचे आर्थिक नियोजन, कर्ज वितरण यावर बँकेची प्रगती अवलंबून असून असते. बँकेची सांपत्तिक स्थिती विचारात घेता बँक भक्कम असून यापुढेही अशाप्रकारे उत्तम कामकाज करावे. बँकेतर्फे राबविणेत येणाऱ्या उपक्रमांची प्रशंसा केली व बँकेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

अध्यक्षीय भाषणामध्ये राहुल रेखावार यांनी बँकींग क्षेत्रामध्ये काम करीत असतान भावनिकदृष्ट्या निर्णय न घेता गरजवंतांनी निकष पूर्ण केलेनंतर पतपुरवठा करावा लागतो हे काम गव्हर्मेट सव्हंट‍ बँकेने उत्तमरित्या करीत असून बँकेने सलग बारा वर्षे एन.पी.ए शून्य टक्के केल्याबद्दल विशेष कौतुक केले. बँकेने जोपासलेल्या उपक्रमांचा थोडक्यात आढावा घेऊन त्यांनी प्रेरणादायी कार्याचे कौतूक केले.