कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराजांनी समतेचा व शाश्वत विकासाचा विचार दिला. सहकारी संस्थांच्या उभारणीतून विकासाला गती दिली. हाचं शाहू महाराजांचा विचार समोर ठेवून सर्वसमावेशक पॅनेल बनवले आहे. त्यामुळेच आजच्या मेळाव्यात ही बहुजन समाजाची एकजूट दिसत आहे. ही एकजूटचं परिवर्तन घडवणार हे निश्चित, असा विश्वास संघाचे सरचिटणीस सुनिल पाटील यांनी व्यक्त केला. राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडीच्या प्रचार मेळाव्यात ते बोलत होते.

या पॅनलमधील डीसीपीएस संघटना, कास्ट्राईब संघटना व शिक्षक भारती संघटनेतील बँक सभासदांचा मेळावा कळंबा येथे आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते.
शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे म्हणाले, कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत परिवर्तन करण्याची गरज आहे. या परिवर्तनासाठी जिल्ह्यातील मुख्य सर्व संघटना एकवटल्या आहेत. त्यामुळे परिवर्तन अटळ आहे, याची साक्ष मेळाव्याला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादातून दिसते, शिक्षक बँक ही केवळ आर्थिक केंद्र नसून शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्याचे ते एक ऊर्जाकेंद्र असते. त्यामुळे या बँकेचे नेतृत्व करणारी मंडळी सुद्धा तशीच असावी लागतात. कोल्हापुरातील सर्व जाणती मंडळी एकत्र येऊन जी आघाडी केली आहे, त्यामुळे शिक्षक बँकेत यावेळी परिवर्तन होणार हे निश्चित. शिक्षक समितीचे सर्व सभासद अनुयायी हे १०० टक्के आघाडीधर्म पाळतील आणि पॅनेलला बहुमताने विजयी करतील हा विश्वास आहे.
यावेळी सरचिटणीस प्रमोद तौंदकर म्हणाले, ज्याप्रमाणे शाहू महाराजांनी सर्व जाती जमातीच्या लोकांना एकत्र करण्याचे काम केले तोच विचार या आघाडीत आम्ही केला आहे.
शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रवी पाटील म्हणाले, जाहीरनाम्यातील अभिवचनानुसार आम्ही सभासदांच्या हिताच्या योजना राबवून शिक्षक बँकेचा आदर्श कामकाज करून दाखवू.
जोतीराम पाटील म्हणाले, गेली १३ वर्ष शिक्षक बँक ताब्यात असताना चांगला कारभार करता आला नाही आणि आता इतिहास घडवण्याची भाषा केली जाते. आता सभासद सत्ताधाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत. त्यांनी बदल घडवायचा निर्धार केला आहे. यावेळच्या निवडणुकीत तरुणांचा उत्साह हीच बदलाची ताकद आहे. तरुणांची हीचं ऊर्जा सत्ताधाऱ्यांना सत्तेपासून दूर सारणार आहे.
यावेळी मंगेश धनवडे, गौतम वर्धन, गजानन कांबळे, अमर वरुटे, प्राजक्ता मेढे, सुनील पाटील, तानाजी घरपणकर, उस्मान पटेल यांनी मनोगते व्यक्त केली. डी. एस. कौशल यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे गीत सादर केले.
यावेळी शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर, विलास चौगले, डीसीपीएस संघटनेचे विद्या भोसले, सुरेखा देवेकर, श्रावणी देवेकर, प्रीती देसाई, स्वप्नील सांगले, राहुल कांबळे, संदीप पाटील, सागर पाटील, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे पी, डी. सरदेसाई, तुकाराम संघवी, डी. के. कांबळे, डी.एस कांबळे, बी. जे. गायकवाड, हेमलता कुर्डूकर, विद्या कांबळे, संजीवनी कांबळे, तानाजी घस्ते, यशवंत सरदेसाई, ए. एल. कांबळे, शिक्षक भारतीचे अमर खोत, दशरथ गावडे, जयसिंग पडवळ, भाऊसो भोसले, आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन संदीप मगदूम, गजानन कुंभार, सलीम जमादार यांनी केले. आभार संजय कुर्डूकर यांनी मानले.