कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी ‘आपलं’ पुरोगामी-समिती-संघ समविचारी परिवर्तन पॅनलची घोषणा करण्यात आली. पुरोगामी संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी विरोधी पॅनलच्या विरोधात एक सक्षम पॅनेल उभे केलं आहे, अशी माहिती पॅनेल प्रमुख गोविंद पाटील, शंकर पवार व तुषार पाटील यांनी पॅनेल मधील उमेदवारांच्या नावांची घोषणा करताना दिली.
‘आपलं’ पुरोगामी -समिती-संघ समविचारी परिवर्तन पँनेलचे अधिकृत उमेदवार : सर्वसाधारण गट :
करवीर – प्रसाद हिंदूराव पाटील (राज्याध्यक्ष- पुरोगामी),
कागल- शिवाजी कृष्णा (एस के ), पाटील (जिल्हाध्यक्ष- पुरोगामी),
आजरा – तानाजी भैरू पावले (जिल्हा उपाध्यक्ष- पुरोगामी),
चंदगड- प्रकाश विष्णू देसाई, (जिल्हा उपाध्यक्ष- पुरोगामी),
गडहिंग्लज- रवळू संतराम पाटील (जिल्हा कार्याध्यक्ष- समिती),
शाहुवाडी- वासंती आनंदराव आसवले (महिला जिल्हा उपाध्यक्ष- पुरोगामी),
शिरोळ – शंकर मारूती कुंभार (शिरोळ अध्यक्ष- पुरोगामी),
पन्हाळा- बाबासो आनंदा रणसिंग (पन्हाळा अध्यक्ष- पुरोगामी),
भुदरगड- विनायक राजाराम चौगुले (जिल्हा उपाध्यक्ष- समिती),
हातकणंगले- जयवंत भास्कर पाटील.(जिल्हाध्यक्ष- अखिल महाराष्ट्र शिक्षक संघ ),
राधानगरी – सर्जेराव बापू ढेरे (राधानगरी अध्यक्ष – पुरोगामी, वस्तीशाळा शिक्षक),
गगनबावडा – विष्णू यशवंत जाधव (जिल्हा उपाध्यक्ष- शिक्षक समिती.)
राखीव महिला गट :
महिला- शारदा रंगराव वाडकर (महिला राज्य सरचिटणीस- पुरोगामी),
महिला- सुमित्रा प्रदिप सावरतकर (आजरा महिला अध्यक्षा- पुरोगामी),
अनु.जाती- सुरेश मशाप्पा कांबळे (जिल्हा नेते, शिक्षक संघ),
भ.वि.जमाती- वैजनाथ माणिकराव दराडे (जिल्हाध्यक्ष- प्रहार शिक्षक संघटना),
इतर मागास- मनोजकुमार गणपती रणदिवे (शिरोळ तालुका अध्यक्ष- शिक्षक सेना)
पॅनेलमधील उमेदवारांच्या नावांची घोषणा झाल्यानंतर प्रसाद पाटील बोलताना म्हणाले, शैक्षणिक, प्रशासकीय व सामाजिक कार्यात अग्रेसर राहून बँकेतील पारदर्शी – काटकसरीच्या कारभाराचा आग्रह धरणाऱ्या या आपल्या ‘आपलं’ पुरोगामी समिती-संघ समविचारी परिवर्तन पँनेलला सभासद प्रचंड मतांनी विजयी करतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.