नवी दिल्ली : महाविकास आघाडीत शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आहे. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते ज्याला मुख्यमंत्री करतील, तो आम्हाला मान्य आहे, असं पवार म्हणाले. मात्र उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार चांगलं चालू आहे. विधानपरिषदेलाही क्रॉसवोटिंग झालं असलं तरी सरकारला काही धोका नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, याआधीही महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला आहे. महाराष्ट्रात सत्तांतराचा हा तिसरा प्रयत्न आहे. भाजपाने यापूर्वी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. मविआ सरकार बनवण्यापूर्वी ही अशी बंडाळी झाली होती. आम्ही विधान परिषदेच्या कालच्या निकालानंतर नाराज नाही. अडीच वर्षे सरकार योग्य चालत असल्याने हे षडयंत्र आहे. राजकीय पेचातून मार्ग निघेल सरकार कोसळणार नाही असा मला विश्वास आहे. तसेच, एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा आहे की नाही माहित नाही”, असे त्यांनी सांगितले.
