कोल्हापूर : राज्यसभेच्या अतीतटीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा विजय झाला. या दिमाखदार विजयानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांतदादा पाटील व नूतन खासदार धनंजय महाडिक हे उद्या दुपारी चार वाजता कोल्हापुरात दाखल होत आहेत. भारतीय जनता पार्टीच्यावतीने या दोन्ही नेत्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात येणार आहे.

राज्यसभेच्या विजयानंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून रात्री निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी आनंदोत्सावाला सुरवात केली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील व नूतन राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे पदाधिकारी,, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये ताराराणी चौकात जल्लोषी स्वागत करण्यात येणार आहे. यानंतर विजय मिरवणुकीच्या माध्यमातून व्हीनस कॉर्नर, दसरा चौक, आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे अंबाबाई देवीच्या आशीर्वादाने या रॅलीची सांगता होणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी, हितचिंतकांनी या विजयी मिरवणुकीत सहभागी होण्याचे आवाहन शहर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी केले आहे.